यहेज्केल २५:८-११
८
“सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘मोआब आणि सेईर म्हणाले, “पाहा, यहूदाह तर इतर राष्ट्रांसारखाच झाला आहे,”
९
म्हणून मी मोआबाची हद्द, त्याच्या सीमेवरील नगरे—बेथ-यशिमोथ, बआल-मेओन व त्या देशाचे वैभव किर्याथाईम उघडे करेन.
१०
अम्मोनी लोकांबरोबर मोआबला सुद्धा मी पूर्वेकडील लोकांना त्यांची मालमत्ता म्हणून स्वाधीन करेन, म्हणजे राष्ट्रांमध्ये अम्मोनी लोकांचे स्मरण केले जाणार नाही;
११
आणि मोआबाला मी शिक्षा करेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”
Settings