Skip to content
यहेज्केल २२:२५-२८

यहेज्केल २२:२५-२८

२५
तिच्यातील राजपुत्रांचा एक कट आहे, ते गर्जना करीत भक्ष फाडणार्‍या सिंहाप्रमाणे आहेत; ते लोकांना ग्रस्त करतात, ते खजिना व मोलवान वस्तू घेतात आणि त्यांच्यात पुष्कळांना विधवा बनवतात.
२६
तिचे याजक माझ्या नियमाचे उल्लंघन करतात व माझ्या पवित्र वस्तूंना अपवित्र करतात; पवित्र व सर्वसामान्य यात ते फरक ठेवत नाहीत; शुद्ध व अशुद्ध यात काही भेद नाही अशी शिकवण ते देतात आणि त्यांच्यात मी अपवित्र मानला जाईल म्हणून माझ्या शब्बाथांकडे दुर्लक्ष करतात.
२७
तिचे सरदार भक्ष फाडणार्‍या लांडग्याप्रमाणे आहेत; अन्यायाने लाभ करून घेण्यासाठी ते रक्तपात करतात व लोकांना जिवे मारतात.
२८
त्यांचे संदेष्टे खोटे दर्शन व लबाड शकुनाद्वारे या सर्व कृत्यांवर चुन्याचा लेप फासतात आणि याहवेह बोलले नाही तरी ते म्हणतात, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options