यहेज्केल १९:२-९
२
आणि म्हण: “ ‘तुझी आई सिंहांमध्ये सिंहीण होती! ती त्यांच्यामध्ये वसत होती आणि तिने तिच्या पिल्लांचे संगोपन केले.
३
तिच्या पिल्लांपैकी एकाला तिने वाढवले, आणि तो एक बलवान सिंह झाला. तो शिकार फाडण्यास शिकला आणि तो नर-भक्षक झाला.
४
तेव्हा राष्ट्रांनी त्याच्याविषयी ऐकले, आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला गेला. त्यांनी त्याला फासात अडकवून इजिप्त देशात नेले.
५
“ ‘जेव्हा त्या सिंहिणीने आपल्या भग्न होत असलेल्या आशा पहिल्या, तिच्या अपेक्षा गेल्या, तिने तिच्या पिल्लांमधून अजून एक पिल्लू घेतले आणि त्याला बलवान सिंह बनविले.
६
तो इतर सिंहांमध्ये फिरू लागला, कारण तो आता बलवान सिंह होता. तो शिकार फाडण्यास शिकला आणि तो नर-भक्षक झाला.
७
त्याने त्यांचे किल्ले मोडले आणि त्यांची नगरे उद्ध्वस्त केली. तो देश व त्यातील राहणारे सर्वजण त्याच्या गर्जनेने भयभीत झाले.
८
तेव्हा इतर राष्ट्र व सभोवतालचे प्रांत त्याच्याविरुद्ध आले, त्यांनी त्याच्यासाठी जाळे पसरले, आणि तो त्यांच्या खड्ड्यात अडकला.
९
त्यांनी त्याला आकड्याने ओढून पिंजर्यात टाकले आणि त्याला बाबेलच्या राजाकडे आणले. त्याने त्याला तुरुंगात ठेवले, म्हणून इस्राएलच्या पर्वतांवर त्याची गर्जना पुन्हा ऐकू आली नाही.
Settings