यहेज्केल १६:१३-१४
१३
याप्रकारे तू सोन्या-चांदीने नटली; तुझी वस्त्रे रेशमी आणि किमती व नक्षीकाम केलेले सुंदर तुझे कपडे होते. मध, जैतुनाचे तेल आणि सपीठ तुझे अन्न होते. तू अति सुंदर होऊन राणी होण्यास योग्य झालीस.
१४
तुझ्या सौंदर्यामुळे तुझी किर्ती अनेक देशांत पसरली, कारण मी तुला दिलेल्या वैभवाने तुझे सौंदर्य परिपूर्ण झाले होते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
Settings