यहेज्केल १३:६-९
६
त्यांचे दृष्टान्त खोटे आहेत आणि त्यांचे शकुन लबाड आहेत. जरी त्यांना याहवेहने पाठवले नाही, तरी ते म्हणतात, “याहवेह जाहीर करतात,” आणि याहवेहने त्यांच्या शब्दाची पूर्तता करावी अशी अपेक्षा बाळगतात.
७
तुम्ही खोटे दृष्टान्त पाहिले नाही काय आणि मी बोललो नाही तरीही, “याहवेह हे जाहीर करतात,” असे तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही खोटा शकुन उच्चारला नाही काय?
८
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमची खोटी वचने व लबाड दृष्टान्त यामुळे मी तुमच्याविरुद्ध आहे असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
९
जे खोटे दृष्टान्त पाहतात आणि लबाड शकुन उच्चारतात, मी माझा हात त्या संदेष्ट्यांच्या विरुद्ध उगारणार. ते माझ्या लोकांच्या बैठकीचा भाग नसतील किंवा इस्राएलच्या यादीत त्यांची नोंद केली जाणार नाही, ना ते इस्राएलच्या देशात प्रवेश करतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.