Skip to content
यहेज्केल १२:९-१६

यहेज्केल १२:९-१६

“हे मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांनी, त्या बंडखोर लोकांनी, ‘तू काय करीत आहेस’ असे विचारले नाही काय?
१०
“त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ही भविष्यवाणी यरुशलेमातील राजपुत्र व तिथे राहत असलेल्या सर्व इस्राएली लोकांसाठी आहे.’
११
त्यांना सांग, ‘तुमच्यासाठी मी चिन्ह आहे.’ “मी जसे केले आहे, तसेच त्यांचेही करण्यात येईल. ते निर्वासित कैद करून नेले जातील.
१२
“त्यांच्यातील राजपुत्र आपले सामान आपल्या खांद्यावर घेऊन संध्याकाळच्या वेळी निघेल आणि त्याला जाण्यासाठी भिंतीत खोदून एक खिंडार खोदले जाईल. भूमी दिसू नये म्हणून तो आपला चेहरा झाकून घेईल.
१३
त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो माझ्या पाशात अकडला जाईल; मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणेन, पण तो त्याला दिसणार नाही, तो तिथे मरून जाईल.
१४
त्याच्या सभोवती असलेले; त्याचे कामकरी व त्याचे सैन्य मी वार्‍यावर पसरवीन; आणि उपसलेल्या तलवारीने मी त्यांचा पाठलाग करेन.
१५
“जेव्हा मी त्यांना राष्ट्रांमध्ये पांगून टाकीन आणि देशांमध्ये त्यांना पसरवीन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.
१६
परंतु त्यांच्यापैकी काहीं लोकांना तलवार, दुष्काळ व मरी यांच्यापासून वाचवेन, यासाठी की ज्या देशांत ते जातील तिथे त्यांची अमंगळ कृत्ये कबूल करतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options