यहेज्केल ११:२२-२५
२२
नंतर करुबांनी, त्यांच्या बाजूला असलेल्या चाकांबरोबर आपले पंख पसरले आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.
२३
नंतर याहवेहचे गौरव शहरातून वर निघाले व पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जाऊन थांबले.
२४
आणि परमेश्वराच्या आत्म्याद्वारे दिलेल्या दृष्टान्तामध्ये, आत्म्याने मला वर उचलले आणि बाबेलच्या निर्वासित लोकांकडे आणले. तेव्हा जो दृष्टान्त मी पाहत होतो तो समाप्त झाला,
२५
आणि याहवेहने मला जे दाखविले होते ते सर्व मी निर्वासित असलेल्यांना सांगितले.
Settings