यहेज्केल १२:३-७
३
“म्हणून, हे मानवपुत्रा, निर्वासित होऊन जाण्यास तू आपले सामान बांध आणि दिवसाच्या प्रकाशात ते तुला पाहत असताच तू जिथे आहेस तिथून नीघ आणि दुसर्या ठिकाणाकडे जा. जरी ते बंडखोर लोक आहेत, तरी कदाचित ते समजतील.
४
दिवसाच्या प्रकाशात, ते तुला पाहत असता निर्वासित म्हणून जाण्यास तू बांधलेले आपले सामान आण आणि संध्याकाळी ते पाहत असता, निर्वासित जाण्यास निघतात त्यांच्यासारखा तू बाहेर जा.
५
ते पाहत असताच भिंत खण व त्यातून आपले सामान बाहेर काढ.
६
ते पाहत असताच ते सामान आपल्या खांद्यावर घे आणि अंधार पडायला लागताच नीघ. तुला भूमी दिसू नये म्हणून आपला चेहरा झाक, कारण मी तुला इस्राएलसाठी एक चिन्ह केले आहे.”
७
मग मला आज्ञा दिली त्याप्रमाणे मी केले. निर्वासित म्हणून जाण्यासाठी दिवसाच्या वेळी मी माझे सामान बाहेर आणले. मग संध्याकाळी माझ्या हाताने मी भिंत खोदली. अंधार पडायला लागला तेव्हा लोक पाहत असता माझ्या खांद्यावर मी माझे सामान वाहून घेतले.
Settings