निर्गम ९:२१
आजूबाजूच्या संदर्भासह वचन २१ दाखवत आहे.
१८
म्हणून उद्या याच वेळेला, इजिप्तची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाला नाही अशा भयानक गारांचा वर्षाव मी करेन.
१९
म्हणून आपआपली जनावरे आणि तुमचे जे काही रानात आहे ते आत आश्रयास आणायला सांग, कारण जे मनुष्य व जनावरे आत आली नाहीत, त्या सर्वांवर गारा पडतील व ते मरतील.”
२०
फारोहच्या ज्या अधिकार्यांना याहवेहच्या शब्दाचे भय वाटले, त्यांनी आपले चाकर व गुरे लगबगीने आत आणली.
२१
पण ज्यांनी याहवेहच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आपले दास व पशू यांना रानातच सोडले.
२२
मग याहवेहने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशाकडे उंच कर म्हणजे संपूर्ण इजिप्त देशावर—मनुष्य, जनावरे व शेतात जे काही आहे त्यावर—गारा पडतील.”
२३
जेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे लांब केली, तेव्हा याहवेहने ढगांच्या गडगडाटांसह गारा पाठविल्या व विजा भूमीवर पडल्या. अशाप्रकारे याहवेहने इजिप्तवर गारांची वृष्टी केली.
२४
गारा पडून चहूकडे विजा लखलखत होत्या, इजिप्त देशाची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाले नाही असे भयंकर वादळ उठले.
Settings