Skip to content
निर्गम ९:१३-२१

निर्गम ९:१३-२१

१३
मग याहवेह मोशेला म्हणाले, “अगदी पहाटेच ऊठ, फारोहची भेट घे आणि त्याला सांग, इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे.
१४
नाहीतर यावेळी मी तुम्हा सर्वांवर म्हणजेच तू व तुझे अधिकारी व तुझे लोक या सर्वांवर भयानक पीडा पाठवेन, ज्यामुळे तुझी खात्री होईल की, सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा इतर कोणी नाही.
१५
वास्तविक मी आतापर्यंत माझा हात लांब करून तुला व तुझ्या लोकांना अशा पीडेने मारून या पृथ्वीतून तुम्हाला नष्ट केले असते.
१६
परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.
१७
तू अजूनही माझ्या लोकांच्या विरोधात राहून त्यांना जाऊ देत नाहीस.
१८
म्हणून उद्या याच वेळेला, इजिप्तची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाला नाही अशा भयानक गारांचा वर्षाव मी करेन.
१९
म्हणून आपआपली जनावरे आणि तुमचे जे काही रानात आहे ते आत आश्रयास आणायला सांग, कारण जे मनुष्य व जनावरे आत आली नाहीत, त्या सर्वांवर गारा पडतील व ते मरतील.”
२०
फारोहच्या ज्या अधिकार्‍यांना याहवेहच्या शब्दाचे भय वाटले, त्यांनी आपले चाकर व गुरे लगबगीने आत आणली.
२१
पण ज्यांनी याहवेहच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आपले दास व पशू यांना रानातच सोडले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options