निर्गम ८:१-४
१
मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा आणि त्याला सांग, याहवेह असे म्हणतात, माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.
२
तू जर त्यांना जाऊ देण्याचे नाकारलेस, तर तुझ्या संपूर्ण देशात मी बेडकांची पीडा पाठवेन.
३
नाईल नदी बेडकांनी भरून जाईल. ते तुझ्या महालात व तुझ्या शयनगृहात, तुझ्या अंथरुणात येतील, तुझ्या अधिकार्यांच्या घरात आणि तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्या व तुझ्या परातीत ते येतील.
४
बेडूक तुझ्यावर आणि तुझ्या लोकांवर आणि तुझ्या सर्व अधिकार्यांवर येतील.”
Settings