Skip to content
निर्गम ३७:२

निर्गम ३७:२

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा कोश तयार केला—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच होता.
त्यावर त्याने आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण घातले आणि त्याच्याभोवती सोन्याचा काठ केला.
त्याने त्यासाठी सोन्याच्या चार कड्या केल्या आणि त्याच्या चार पायांना दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्‍या बाजूला लावल्या.
मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण घातले.
आणि ते दांडे कोश वाहून नेण्यासाठी कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options