निर्गम ३४:२७-२९
२७
मग याहवेह मोशेला म्हणाले, “हे शब्द लिही, कारण या शब्दांनुसार मी तुझ्याशी व इस्राएलाशी करार केला आहे.”
२८
मोशे त्या ठिकाणी भाकरी न खाता किंवा पाणी न पिता चाळीस दिवस व चाळीस रात्र याहवेहबरोबर राहिला आणि त्याने पाट्यांवर कराराचे शब्द, म्हणजेच दहा आज्ञा लिहिल्या.
२९
जेव्हा मोशे आपल्या हातात कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरून आला, तेव्हा याहवेहबरोबर बोलल्यामुळे त्याचा चेहरा तेजस्वी झाला होता, हे त्याच्या लक्षात आले नाही.
Settings