Skip to content
निर्गम ३२:३०-३५

मोशे इस्राएलसाठी मध्यस्थी करतो

निर्गम ३२:३०-३५
३०
मग दुसर्‍या दिवशी मोशे लोकांना म्हणाला, “तुम्ही मोठे पाप केले आहे, पण आता मी वर याहवेहकडे जाईन; कदाचित मी तुमच्या पापासाठी प्रायश्चित करू शकेन.”
३१
मग मोशे याहवेहकडे परत गेला आणि म्हणाला, “अरेरे, या लोकांनी केवढे मोठे पाप केले आहे! त्यांनी आपल्या स्वतःसाठी सोन्याचे दैवत केले आहेत.
३२
परंतु आता कृपा करून त्यांच्या पापांची क्षमा करा—नाहीतर जे पुस्तक तुम्ही लिहिले आहे, त्यातून माझे नाव मिटवून टाका.”
३३
तेव्हा याहवेहने मोशेला उत्तर दिले, “ज्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, त्यांचीच नावे मी माझ्या पुस्तकातून मिटवून टाकीन.
३४
आता जा आणि ज्या ठिकाणाविषयी मी बोललो त्याकडे लोकांना चालव आणि माझा दूत तुमच्यापुढे जाईल. तथापि, जेव्हा शिक्षा करण्याची वेळ येईल, तेव्हा मी त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देईन.”
३५
अहरोनाने केलेल्या वासराशी लोकांनी जे केले होते त्यासाठी याहवेहने त्यांच्यावर पीडा आणून त्यांना शासन केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options