मुख्य मजकुरावर जा
निर्गम ३२:१-८

सोन्याचे वासरू

निर्गम ३२:१-८
मोशेला पर्वतावरून खाली येण्यास उशीर होत आहे असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोना सभोवती गोळा झाले व म्हणाले, “ये, आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव. हा मनुष्य ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही.”
अहरोनाने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या स्त्रिया, तुमचे पुत्र व तुमच्या कन्यांनी घातलेले कानातील सोन्याचे डूल काढून, ते माझ्याकडे आणा.”
म्हणून सर्व लोकांनी ते कानातील सोन्याचे डूल काढून ते अहरोनाकडे आणले.
लोकांनी जे अहरोनाच्या हातात दिले, ते घेऊन त्याने हत्याराने कोरून, वासराची ओतीव मूर्ती बनविली. मग ते म्हणाले, “हे इस्राएला, ही तुमचे दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.”
अहरोनाने जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्याने त्या वासरासमोर एक वेदी बांधली व जाहीर केले, “उद्या याहवेहसाठी एक उत्सव करावयाचा आहे.”
म्हणून दुसर्‍या दिवशी लोक लवकर उठले आणि होमार्पणाचा यज्ञ केला व शांत्यर्पणे आणले. त्यानंतर त्यांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.
मग याहवेह मोशेला म्हणाले, “खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्तमधून बाहेर आणलेस, ते भ्रष्ट झाले आहेत.
मी त्यांना दिलेल्या आज्ञांपासून ते फार लवकरच फिरले आहेत आणि आपल्यासाठी वासराची ओतीव मूर्ती तयार केली आहे. त्यांनी त्याच्यासमोर नमन केले आहे आणि यज्ञ करून म्हटले आहे, ‘हे इस्राएला, ही तुमची दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले आहे!’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options