Skip to content
निर्गम ३०:१६-३८

निर्गम ३०:१६-३८

१६
इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”
१७
मग याहवेह मोशेला म्हणाले,
१८
“तू कास्याचे गंगाळ व त्याची कास्याची बैठक तयार करावी. ते सभामंडप व वेदीच्या मध्ये ठेवून त्यात पाणी भरावे
१९
अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्यातील पाण्याने आपले हात व पाय धुवावे.
२०
जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात व पाय पाण्याने धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत आणि जेव्हा ते याहवेहला अन्नार्पण करण्याची सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातात,
२१
त्यांनी आपले हात व पाय धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत. हा नियम अहरोन व त्याच्या येणार्‍या वंशाच्या प्रत्येक पिढीसाठी असावा.”
२२
मग याहवेह मोशेला म्हणाले,
२३
“पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार हे उत्तम मसाले घे: पाचशे शेकेल गंधरस, त्याच्या अर्धे म्हणजे दोनशे पन्नास शेकेल सुगंधी दालचिनी, दोनशे पन्नास शेकेल सुगंधी वेखंड,
२४
पाचशे शेकेल गोलाकार दालचिनी, सर्व पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार, व एक हीन भरून जैतुनाचे तेल.
२५
यातून पवित्र अभिषेकाचे तेल, सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे तयार करावे. ते पवित्र अभिषेकाचे तेल असेल.
२६
त्या तेलाचा उपयोग सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश,
२७
मेज व त्याचे सामान, दीपस्तंभ व त्याची उपकरणे, धूपवेदी,
२८
होमार्पणाची वेदी, तिची सर्व पात्रे, बैठकासह गंगाळ यांचा अभिषेक करण्यासाठी करावा.
२९
ते तू पवित्र करावे म्हणजे ते परमपवित्र होतील आणि ज्याला त्यांचा स्पर्श होईल ते पवित्र होईल.
३०
“याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून त्यांना पवित्र कर.
३१
इस्राएली लोकांना सांग, ‘येणार्‍या पिढ्यांपर्यंत हे माझे पवित्र अभिषेकाचे तेल असावे.
३२
इतर कोणत्याही मनुष्याच्या शरीरावर ते ओतू नये आणि या मिश्रणाचा वापर करून दुसरे तेल बनवू नये. ते पवित्र आहे आणि तुम्ही त्याला पवित्र मानावे.
३३
जे कोणी याप्रकारे तेल तयार करेल आणि याजका व्यतिरिक्त इतर कोणाला लावेल, ते आपल्या लोकांतून काढून टाकले जातील.’ ”
३४
मग याहवेह मोशेला म्हणाले, “गंधरस, जटामांसी व गंधाबिरुजा व शुद्ध ऊद हे सुगंधी मसाले घे, हे सर्व समान प्रमाणात असावे,
३५
सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे सुगंधी धूप बनव. तो मीठ घातलेला, शुद्ध आणि पवित्र असावा.
३६
त्यातील काही कुटून त्याची बारीक भुकटी करावी व ती सभामंडपातील कराराच्या नियमाच्या कोशापुढे ठेवावी, जिथे मी तुला भेटत जाईन. ती तुमच्यासाठी परमपवित्र असावी.
३७
या मिश्रणाचा वापर करून स्वतःसाठी धूप तयार करू नये; याहवेहसाठी तो पवित्र मानला जावा.
३८
त्या सुगंधाचा आनंद घेण्यासाठी जो कोणी याप्रकारचा धूप बनवेल, त्याला आपल्या लोकांतून काढून टाकले जावे.”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options