निर्गम २९:२६-३४
२६
मग अहरोनाच्या समर्पणाकरिता मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन त्याला ओवाळणीचे अर्पण घेऊन याहवेहसमोर त्याची ओवाळणी कर आणि तो तुझा वाटा राहील.
२७
“समर्पणाच्या मेंढ्याचे ते भाग म्हणजेच, त्याचे ऊर ज्याची ओवाळणी केली होते व मांडीचा भाग जो सादर केला होता तो अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या मालकीचे आहे, ते भाग पवित्र कर.
२८
हा नेहमीच इस्राएली लोकांकडून अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी शाश्वत हिस्सा असावा. हे इस्राएली लोकांकडून शांत्यर्पणातून याहवेहस दिलेली वर्गणी असावी.
२९
“अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर त्याच्या वंशजांची व्हावीत अशासाठी की त्यामध्ये त्यांचा अभिषेक व समर्पण व्हावे.
३०
त्याचा पुत्र जो याजक म्हणून त्याचा वारस होईल आणि सभामंडपात सेवा करण्यासाठी पवित्रस्थानात येईल त्याने ती वस्त्रे सात दिवस अंगात घालावी.
३१
“समर्पणासाठी असलेला मेंढा घेऊन पवित्र जागी त्याचे मांस शिजवावे.
३२
मग अहरोन व त्याच्या पुत्रांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वारात ते मेंढ्याचे मांस टोपलीतील समर्पित भाकरीसह खावी.
३३
त्यांचे समर्पण आणि पवित्रीकरण करण्यासाठी प्रायश्चित्त केलेले अर्पण त्यांनी खावे. परंतु कोणी परक्याने ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे.
३४
आणि समर्पणाच्या मेंढ्याचे मांस व भाकरीतील काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे. ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे.
Settings