निर्गम २९:१६-१८
१६
मेंढ्याचा वध करावा व त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे.
१७
मेंढा कापून तुकडे करावेत आणि त्याचे आतील अवयव व पाय धुऊन त्याचे तुकडे व डोके इतर भागांबरोबर ठेवावे.
१८
मग संपूर्ण मेंढ्याचे वेदीवर होम कर. तो याहवेहसाठी होमार्पण आहे, ते सुवासिक असे, याहवेहसाठी सादर केलेले अन्नार्पण आहे.