Skip to content
निर्गम २८:२३-२८

निर्गम २८:२३-२८

२३
ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावण्यासाठी सोन्याच्या दोन कड्या बनवाव्या.
२४
त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये घालाव्या,
२५
आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडून घ्याव्या.
२६
सोन्याच्या दोन कड्या तयार कर व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडाव्या.
२७
सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडाव्या.
२८
ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने, कमरबंदाला जोडतील अशा बांधाव्या, म्हणजे ऊरपट एफोदावरून सरकणार नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options