निर्गम २६:१-१२
१
“निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार करावा, त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावे.
२
सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात असावी.
३
पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व इतर पाच पडद्यांचेही तसेच करावे.
४
जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनवावे आणि दुसर्या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच करावे.
५
एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्या पडद्याच्या किनारीपर्यंत पन्नास फासे करावे, हे फासे समोरासमोर असावेत.
६
मग सोन्याचे पन्नास आकडे तयार करावेत आणि त्याचा उपयोग पडद्यांना एकत्र जोडण्यासाठी करावा की निवासमंडप अखंड होईल.
७
“निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी बोकडाच्या केसाचे पडदे तयार करावेत; ते अकरा पडदे असावेत.
८
सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात. असावी.
९
पाच पडदे एकत्र व इतर सहा पडदे एकत्र असे जोडावेत. सहावा पडदा मंडपाच्या पुढील बाजूस दुमडावा.
१०
जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर शेवटपर्यंत पन्नास फासे करून तो एकजोड करावा आणि दुसर्या पडद्यापैकी किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड करावा.
११
मग कास्याचे पन्नास आकडे करावेत आणि ते फासात घालून असे जोडावे की तंबू एकजोड होईल.
१२
तंबूच्या पडद्याचा उरलेला भाग, म्हणजे जो अर्धा पडदा उरतो, तो निवासमंडपाच्या मागच्या बाजूस टांगलेला असू द्यावा.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings