निर्गम २५:१०-१६
१०
“त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार करावा—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच.
११
त्याला आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याच्याभोवती सोन्याचा काठ करावा.
१२
त्यासाठी सोन्याच्या चार कड्या बनवून कोशाच्या चार पायांना, दोन कड्या एका बाजूला व दोन कड्या दुसर्या बाजूला अशा त्या बसवाव्यात.
१३
मग बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण द्यावे.
१४
कोश वाहून नेण्यासाठी ते दांडे दोन्ही बाजूंच्या कड्यात घालाव्या.
१५
या दांड्या कोशाच्या कड्यातच असाव्यात; त्या काढू नये.
१६
मग कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार, त्या तू कोशाच्या आत ठेवाव्यात.
Settings