Skip to content
निर्गम २१:२८-३६

प्राण्यांची जबाबदारी आणि मालमत्तेबद्दलचे नियम

निर्गम २१:२८-३६
२८
“एखाद्या बैलाने एखाद्या पुरुष किंवा स्त्रीस हुंदडून जिवे मारले, तर त्या बैलास धोंडमार करून ठार मारावे व त्याचे मांस खाऊ नये. परंतु बैलाचा मालक निर्दोष असून जबाबदार असणार नाही.
२९
पण बैल मारका आहे याबद्दल त्याच्या मालकाला सूचना देऊनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही व तो एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकतो, तर त्या बैलाला धोंडमार करावी व त्याच्या मालकास सुद्धा जिवे मारावे.
३०
परंतु जर त्याच्याकडून खंडणी मागितली असेल, तर जेवढी रक्कम मागितली ती देऊन तो मालक आपला जीव वाचवू शकतो.
३१
एखाद्याच्या पुत्राला किंवा कन्येला बैलाने हुंदडून मारले, तरी हाच नियम लागू व्हावा.
३२
पण बैलाने जर एखाद्या स्त्री किंवा पुरुष गुलामाला हुंदडून मारले, तर त्या गुलामाच्या मालकाला बैलाच्या मालकाने तीस चांदीची नाणी द्यावीत व बैलाला धोंडमार करावी.
३३
“जर कोणी एखादा खड्डा उघडला किंवा खणला व तो झाकला नाही आणि त्यात बैल किंवा गाढव पडले,
३४
तर ज्याने तो खड्डा उघडला त्याने जनावराच्या मालकाला त्याची किंमत मोजून द्यावी व त्याबदल्यात ते मेलेले जनावर घ्यावे.
३५
“जर कोणाच्या बैलाने दुसर्‍याच्या बैलाला हुंदडून मारले, तर त्या दोघांनी जिवंत असलेला बैल विकून आलेली रक्कम व मेलेला बैल यांचा सारखा वाटा करून घ्यावा.
३६
पण आपला बैल मारका आहे हे त्या बैलाच्या मालकाला माहिती असूनही, त्याने त्या बैलाला बांधले नाही, तर त्याच्या धन्याने जनावराबद्दल भरपाई करावी व मेलेले जनावर घ्यावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options