निर्गम १६:१३
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १३ दाखवत आहे.
१०
अहरोन सर्व इस्राएली लोकांशी बोलत असताना, त्यांनी रानाकडे पाहिले आणि त्यांना याहवेहचे गौरव ढगात प्रकट होत असलेले दिसले.
११
याहवेह मोशेला म्हणाले,
१२
“मी इस्राएली लोकांची कुरकुर ऐकली आहे. त्यांना सांग, ‘सायंकाळी तुम्ही मांस खाल, व सकाळी तुम्ही भाकरीने तृप्त व्हाल. मग तुम्हाला समजेल की, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
१३
त्या संध्याकाळी लावे पक्षी त्यांच्या वस्तीवर येऊन उतरले व त्यामुळे छावणी व सभोवतालची सर्व जमीन झाकली गेली आणि सकाळी छावणी सभोवती दवबिंदूंचा थर जमला होता.
१४
जेव्हा दवबिंदू नाहीसे झाले, तेव्हा रानातील भूमीवर हिमकणांएवढे खवल्यांसारखे बारीक तुकडे पसरलेले दिसू लागले.
१५
जेव्हा इस्राएली लोकांनी ते पाहिले, ते एकमेकास म्हणू लागले, “हे काय आहे?” कारण ते काय होते ते त्यांना ठाऊक नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, “हीच ती भाकर आहे जी याहवेहने तुम्हाला खाण्यासाठी दिली आहे.
१६
याहवेहने दिलेली आज्ञा ही: ‘प्रत्येकाने त्यांना लागते तेवढे गोळा करावे. तुमच्या तंबूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक ओमेर एवढे घ्यावे.’ ”
Settings