Skip to content
निर्गम १३:१७-२०

निर्गम १३:१७-२०

१७
शेवटी फारोहने जेव्हा लोकांस जाऊ दिले, तेव्हा परमेश्वराने त्यांना पलिष्ट्यांच्या देशातून जवळचा मार्ग असूनही तिथून चालविले नाही. कारण परमेश्वर म्हणाले, “जर युद्धाला सामोरे जावे लागले तर त्यांचे मन बदलेल व ते पुन्हा इजिप्तकडे जातील.”
१८
म्हणून परमेश्वराने त्यांना तांबड्या समुद्राकडून रानाच्या मार्गाने नेले. इस्राएली लोक लढाईसाठी सज्ज होऊन इजिप्तमधून बाहेर पडले.
१९
मोशेने योसेफाची हाडे आपल्याबरोबर घेतली. कारण, योसेफाने इस्राएली लोकांकडून शपथ घेतली होती. तो म्हणाला होता, “परमेश्वर खरोखर तुमच्या मदतीला येईल, तेव्हा तुमच्याबरोबर माझी हाडे या ठिकाणातून घेऊन जा.”
२०
सुक्कोथ शहर सोडल्यावर त्यांनी वाळवंटाच्या सीमेवर एथाम येथे तळ दिला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options