निर्गम १२:१४-१७
१४
“हा दिवस तुम्ही याहवेहचा सण म्हणून पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने पाळावा.
१५
सात दिवस तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. पहिल्या दिवशी आपल्या घरातून खमीर काढून टाकावे, कारण जे कोणी या सात दिवसात खमीर घातलेल्या वस्तू खाईल, त्याला इस्राएलातून बेदखल करण्यात यावे.
१६
पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी आणि सातव्या दिवशी दुसरी सभा. या दिवसात प्रत्येकाने खाण्यासाठी अन्न तयार करण्याशिवाय इतर कोणतेही काम करू नये.
१७
“बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सैन्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने तो पाळावा.
Settings