मुख्य मजकुरावर जा
निर्गम १०:२१-२९

अंधाराची पीडा

निर्गम १०:२१-२९
२१
नंतर याहवेहने मोशेला म्हटले, “तू आपला हात वर आकाशाकडे लांब कर, म्हणजे इजिप्त देशावर अंधार पडेल—इतका अंधार की त्याला लोक चाचपडतील.”
२२
तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि तीन दिवसांसाठी निबिड अंधकाराने संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला.
२३
कोणी कोणाला पाहू शकत नव्हते व तीन दिवस कोणी आपल्या ठिकाणाहून हलला नाही, परंतु जिथे इस्राएली लोक राहत होते तिथे मात्र प्रकाश होता.
२४
तेव्हा फारोहने मोशेला बोलावून घेतले. तो म्हणाला, “जा, आणि याहवेहची उपासना करा. तुमच्या स्त्रिया व लेकरे सुद्धा तुमच्याबरोबर जाऊ शकतात; तुमची जनावरे व शेरडेमेंढरे मात्र सोडून जा.”
२५
परंतु मोशे म्हणाला, “याहवेह, आमचा परमेश्वर यास आम्ही यज्ञ व होमबली अर्पण करावे म्हणून जाऊ दे.
२६
आमची जनावरे सुद्धा आमच्याबरोबर गेली पाहिजेत; एक खूर देखील आम्ही मागे ठेवणार नाही. आम्हाला त्यांच्यापैकी काहींचा याहवेह आमचे परमेश्वर यांची उपासना करण्यास वापर करावयाचा आहे, आणि त्यात आम्ही काय वापरावे हे आम्ही त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आम्हाला समजणार नाही.”
२७
पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले, व तो त्यांना जाऊ देण्यास मान्यता देईना.
२८
फारोह मोशेला म्हणाला, “माझ्यासमोरून चालता हो! आपले तोंडसुध्दा मला पुन्हा दाखवू नकोस! ज्या दिवशी तू माझे तोंड पाहशील त्या दिवशी तू मरशील.”
२९
“तू म्हणालास तसेच होईल,” मोशे म्हणाला. “मी पुन्हा तुझ्यासमोर उभा राहणार नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options