एस्तेर ७:४-६
४
कारण मी व माझे लोक, आमचा नाश, कत्तल व नामशेष करणार्यांना विकले गेलो आहोत. स्त्री व पुरुषांची केवळ गुलाम म्हणून विक्री झाली असती, तर कदाचित मी गप्प राहिले असते. त्यामुळे राजास कष्ट देण्याची गरज पडली नसती.”
५
तेव्हा अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीला विचारले, “तो कोण आहे? कुठे आहे तो—जो असे काही करण्याचे धाडस करेल?”
६
त्यावर उत्तर देत एस्तेर म्हणाली, “हा वैरी व शत्रू! हा दुष्ट हामान!” तेव्हा राजा आणि राणी यांच्यापुढे हामान अत्यंत भयभीत झाला.
Settings