Skip to content
इफिसकरांस ६:२१-२४

तुखिक आणि अंतिम आशीर्वाद

इफिसकरांस ६:२१-२४
२१
येथे मी कसा आहे व काय करीत आहे, यासंबंधीची सर्व हकिकत माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी तुखिक तुम्हाला सांगेल.
२२
आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुम्हाला प्रोत्साहित करावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे पाठवित आहे.
२३
बंधू व भगिनींना शांती असो आणि परमेश्वर जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला विश्वासाबरोबर प्रीती प्राप्त होवो!
२४
आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर शाश्वत प्रीती करणार्‍या तुम्हा सर्वांवर कृपा असो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options