उपदेशक ९:११-१२
११
मी सूर्याखाली आणखी काहीतरी वेगळे पाहिले: शर्यत वेगवानांसाठी नाही, किंवा युद्ध बलवानाचे नाही, सुज्ञानी लोकांनाच भोजन मिळते असे नाही किंवा बुद्धिमानाला धन मिळते असे ही नाही किंवा कुशल कारागिरांवरच अनुग्रह होईल, असे नाही; परंतु समय व प्रसंग सर्वांनाच येतो.
१२
आपल्यावर कधी वेळ येणार हे कोणालाही ठाऊक नाही: जसा मासा त्या क्रूर जाळ्यात सापडतो, किंवा पक्षी फासात अडकला जातो, तसेच लोकसुद्धा त्यांच्यावर अचानक पडलेल्या वाईट समयात अडकले जातात.
Settings