Skip to content
उपदेशक ७:१६-२३

उपदेशक ७:१६-२३

१६
अति नीतिमान होऊ नका, किंवा अति सुज्ञानीही असू नका— तुम्ही स्वतःचा नाश का करून घ्यावा?
१७
अति दुष्ट होऊ नका, आणि मूर्खही असू नका— तुमची वेळ येण्यापूर्वी का मरावे?
१८
पहिल्याला घट्ट धरून ठेवणे, आणि दुसर्‍यालाही सोडून न देणे हे बरे. जे परमेश्वराचे भय धरतात ते अतिरेक टाळतील.
१९
सुज्ञान एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला एका शहराच्या दहा शासकांपेक्षा अधिक शक्तिशाली बनवते.
२०
खरोखर, या पृथ्वीवर नीतिमान असा कोणीही नाही, असा एकही व्यक्ती नाही जो चांगलेच करतो आणि कधीच पाप करीत नाही.
२१
लोकांच्या प्रत्येक शब्दांकडे लक्ष देऊ नका, नाहीतर तुमचा चाकरसुद्धा तुम्हाला शाप देताना तुम्ही ऐकाल—
२२
कारण तुम्ही इतरांना कितीदा शाप दिला हे तुम्हाला तुमच्या मनातच ठाऊक आहे.
२३
सुज्ञानाने मी या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या आणि म्हटले, “मी सुज्ञानी होण्याचे ठरविले आहे”— परंतु हे माझ्या शक्तीच्या पलीकडे होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options