उपदेशक ७:१-८
१
सन्माननीय नाव हे सुवासिक अत्तरापेक्षा उत्तम आहे, आणि मृत्युदिन जन्म दिवसापेक्षा उत्तम आहे.
२
मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाकुल घरात जाणे हे अधिक उत्तम आहे, प्रत्येक मनुष्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी; मृत्यू हे सर्वांचे विधिलिखित आहे.
३
विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे, कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे.
४
सुज्ञानी मनुष्याचे हृदय शोकाकुल घरात असते, परंतु मूर्खांचे हृदय सुखाच्या घरात असते.
५
सुज्ञानी व्यक्तीच्या निषेधाकडे लक्ष देणे मूर्खाचे गीत ऐकण्यापेक्षा उत्तम आहे.
६
मूर्खाचे हसणे हे पात्राखालील अग्नीतील तडतडणाऱ्या काट्यांप्रमाणे आहे, हे सुद्धा व्यर्थ आहे.
७
पिळवणूक सुज्ञानी मनुष्याला मूर्ख बनविते, आणि लाच हृदयाला भ्रष्ट करते.
८
एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा, आणि गर्वापेक्षा सहनशीलता बरी.
Settings