उपदेशक ४:१४
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १४ दाखवत आहे.
११
जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार?
१२
एकट्या व्यक्तीवर मात करता येते, दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.
१३
मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले.
१४
तो तरुण तुरुंगातून राज्यपदावर आला असेल किंवा त्या राज्यात गरिबीत जन्मला असेल.
१५
मी हे पाहिले की या सूर्याखाली जे जिवंत आहेत ते त्या तरुणाचे अनुकरण करतात, जो राज्याचा उत्तराधिकारी आहेत.
१६
त्यांच्या पूर्वी असंख्य लोक होते. परंतु जे नंतर आले ते त्या उत्तराधिकाऱ्याशी संतुष्ट नव्हते. हे सर्वसुद्धा व्यर्थच, वार्याचा पाठलाग करण्यासारखे आहे.
Settings