उपदेशक २:१६-१९
१६
कारण सुज्ञसुद्धा मूर्खाप्रमाणे जास्त काळापर्यंत स्मरणात ठेवला जाणार नाही; असे दिवस आले आहेत, जेव्हा दोघांचाही विसर पडेल. मूर्खाप्रमाणे सुज्ञसुद्धा मरण पावेल!
१७
म्हणून आता मला जीवनाचा वीट आला आहे, कारण सूर्याखाली जे काही केले जात आहे, ते मला दुःख देणारे आहे. ते सर्वकाही व्यर्थ, वार्यामागे धावण्यासारखे आहे.
१८
या सूर्याखाली मी ज्याच्यासाठी कष्ट केले, त्या सर्वाचा मला द्वेष वाटू लागला, कारण जे लोक माझ्यानंतर येणार त्यांच्यासाठी ते मला सोडून द्यावे लागणार.
१९
कोणाला माहीत की तो व्यक्ती सुज्ञ असेल वा मूर्ख? तरीही सूर्याखाली ज्यामध्ये मी माझे प्रयत्न आणि कौशल्य ओतले, त्या माझ्या या कष्टाच्या प्रतिफळांचा ताबा त्यांच्याकडे असेल. हे सुद्धा व्यर्थच आहे.
Settings