मुख्य मजकुरावर जा
उपदेशक १:४-११

कंटाळवाण्या पुनरावृत्तीची चक्रे

उपदेशक १:४-११
पिढ्या येतात आणि पिढ्या जातात, परंतु पृथ्वी सर्वकाळ अस्तित्वात राहते.
सूर्य उगवतो आणि अस्त पावतो, आणि आपल्या उगवतीच्या स्थानाकडे घाईने परत जातो.
वारा दक्षिणेकडे वाहतो आणि उत्तरेकडे वळतो; तो गोल गोल भ्रमण करीत आपल्या ठिकाणी परत जातो.
सर्व प्रवाह समुद्रास मिळतात, तरीही समुद्र कधी भरलेला नाही. नद्या पुन्हा त्या स्थानाकडून वाहू लागतात, जिथून त्यांचा उगम होतो,
सर्वकाही त्रासाने भरलेले आहे, जे कोणाला शब्दात सांगता येत नाही. नेत्र बघून कधी समाधानी होत नाहीत. कान सुद्धा ऐकून भरत नाहीत.
जे घडले ते पुन्हा एकदा होणार, जे केले गेले आहे, ते पुन्हा केले जाईल; सूर्याखाली नवे असे काही नाही.
१०
“पाहा! हे काहीतरी नवे आहे, असे कोणी म्हणू शकेल काय?” हे तर पूर्वकाळापासूनच होते; आमच्या काळापूर्वीच ते होते.
११
पुढे येणार्‍या पिढीला, पूर्वीच्या पिढ्यांची आठवण नाही आणि पुढे येणार्‍या पिढीला सुद्धा त्याचे स्मरण नसेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options