अनुवाद ६:३
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ३ दाखवत आहे.
१
यार्देन ओलांडून त्या वचनदत्त देश ताब्यात घ्यायचा आहे, त्या देशात तुम्हाला पाळावयास शिकविण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने मला सांगितलेल्या आज्ञा, विधी व नियम हे आहेत,
२
यासाठी की तुम्ही, तुमचे पुत्र, पौत्रे यांनी याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे. मी तुम्हाला दिलेले सर्व नियम व आज्ञा तुम्ही पाळत राहाल तर तुम्ही दीर्घायुष्याचा आनंद घ्याल.
३
म्हणून इस्राएली लोकहो ऐका आणि काळजीपूर्वक आज्ञा पाळा म्हणजे तुमचे भले होईल आणि याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे दूध व मध वाहणार्या देशात तुम्ही बहुगुणित व्हाल.
४
हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत.
५
याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.
६
या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या.
Settings