Skip to content
अनुवाद २८:३०-३३

अनुवाद २८:३०-३३

३०
तुमच्या वाग्दत्त वधूला दुसराच कोणी नेईल व तिचे शीलभंग करेल. तुम्ही घर बांधाल, पण त्यामध्ये तुम्ही राहणार नाही. तुम्ही द्राक्षमळा लावाल, पण त्या फळांचा उपभोग तुम्ही करू शकणार नाही.
३१
तुमच्या डोळ्यादेखतच तुमच्या बैलांची कत्तल करण्यात येईल, पण त्यांचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमच्यासमक्ष तुमची गाढवे जबरदस्तीने हाकलून नेण्यात येतील, पण ती तुम्हाला परत देणार नाहीत. तुमची मेंढरे तुमच्या शत्रूंना देण्यात येतील आणि त्यांना कोणीही सोडविणार नाही.
३२
तुमच्या पुत्र व कन्यांना दुसर्‍या देशात देण्यात येईल आणि तुमचे डोळे त्यांना पाहण्याच्या उत्कट इच्छेने क्षीण होतील आणि तुम्ही तुमचे हातही वर उचलण्यास असमर्थ व्हाल.
३३
तुम्ही कष्ट करून वाढविलेली पिके एखादे परकीय राष्ट्र, ज्याचे नावही तुम्ही कधी ऐकले नाही, ते खातील. तुमची नेहमीच छळवणूक होईल व तुम्ही नेहमीच चिरडले जाल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options