Skip to content
अनुवाद २८:३८-४८

आर्थिक उध्वस्तता व परकीय प्रभुत्व

अनुवाद २८:३८-४८
३८
तुम्ही पुष्कळ बी पेराल, पण थोडक्याच पिकांची कापणी कराल, कारण टोळ ते खाऊन टाकतील.
३९
तुम्ही द्राक्षमळे लावून त्यांची निगा राखाल; पण तुम्हाला द्राक्षे खावयाला मिळणार नाहीत किंवा द्राक्षारस प्यावयास मिळणार नाही. कारण कीड त्यांना खाऊन टाकेल.
४०
तुमच्या सर्व देशात जैतुनाची झाडे वाढतील, पण तुम्ही तेलाचा उपयोग करू शकणार नाही. तुम्हाला तेल लावण्यासाठी पुरेसे जैतून तेल मिळणार नाही, कारण त्यांची फळे गळून जातील.
४१
तुम्हाला पुत्र व कन्या होतील, पण त्यांना तुम्ही ठेऊ शकणार नाही, कारण ते गुलामगिरीत जातील.
४२
टोळधाड येऊन तुमच्या भूमीवरील वृक्षांचा आणि पिकांचा नाश करतील.
४३
तुम्हामध्ये राहणारे परदेशी लोक तुमच्यावर अधिकाधिक वरचढ होत जातील, पण तुमची अधिकाधिक अधोगती होत जाईल.
४४
ते तुम्हाला उसने देतील, पण तुम्ही त्यांना उसने देऊ शकणार नाही. ते मस्तक होतील आणि तुम्ही शेपूट व्हाल.
४५
हे सर्व शाप तुमच्यावर येतील. ते तुमचा नाश होईपर्यंत पाठपुरावा करतील आणि तुम्हाला गाठतील, कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही व ज्या आज्ञा आणि विधी त्यांनी तुम्हाला दिले त्याचे पालन करण्याचे नाकारले.
४६
ही अरिष्टे सदैव तुमच्यावर व तुमच्या संततीवर चिन्ह आणि चमत्कार असे होतील.
४७
कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची समृद्धीच्या काळात आनंदाने आणि हर्षाने सेवा केली नाही,
४८
म्हणून तुम्ही याहवेहने पाठविलेल्या तुमच्या शत्रूंचे गुलाम व्हाल आणि तुम्ही भुकेले, तहानलेले, नग्न आणि अत्यंत गरीब असे व्हाल आणि ते तुमचा नाश करेपर्यंत तुमच्या मानेवर लोखंडी जू ठेवण्यात येईल.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.