Skip to content
अनुवाद १९:४-७

अनुवाद १९:४-७

जो कोणी एखाद्या व्यक्तीची हत्या करतो आणि आश्रयाच्या नगरात पळून जातो, त्याच्यासाठी हे नियम असावे: एखाद्या मनुष्याने मनात काहीही द्वेष नसताना व हेतुपुरस्सर नव्हे, पण चुकून त्याच्या शेजार्‍याचा वध केला.
एखादा मनुष्य लाकडे तोडण्यासाठी आपल्या शेजार्‍याबरोबर अरण्यात गेला आणि झाड तोडत असता त्याने कुर्‍हाड चालविली व ती दांड्यातून निसटून उडाली व त्याच्या शेजार्‍याला ती लागली आणि तो मरण पावला, तर त्या मनुष्याने पळून जाऊन या तीन शहरांपैकी एका शहराचा आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.
नाही तर, अशा रक्तपाताबद्दल सूड घेणारा संतापाने त्याचा पाठलाग करेल व मार्ग लांब असल्याने त्याला वाटेत गाठून ठार मारेल. त्याला मृत व्यक्तीबद्दल द्वेष नव्हता व त्याने पूर्वनियोजित केल्याशिवाय आपल्या शेजार्‍याशी हे कृत्य केले, तो प्राणदंडाच्या शिक्षेस पात्र नव्हता.
म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो की तीन शहरे निवडून ती वेगळी करून ठेवावी.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options