Skip to content
अनुवाद १९:१४

मालमत्तेच्या सीमांचे रक्षण

अनुवाद १९:१४
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १४ दाखवत आहे.
११
परंतु कोणी द्वेषाने दबा धरून राहील व आपल्या शेजार्‍यावर अचानक प्राणघातक हल्ला करून त्याला ठार करेल आणि मग यापैकी एखाद्या शहरात पळून जाईल,
१२
तर त्या गावाच्या वडील मंडळीने माणसे पाठवून त्याला धरून आणावे व त्याला वध झालेल्या माणसाच्या रक्तपाताचा सूड घेणार्‍याच्या स्वाधीन करावे.
१३
त्याला दया दाखवू नये. इस्राएलास निरपराधी माणसांचे रक्त सांडल्याच्या दोषापासून शुद्ध करावे, म्हणजे तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल.
१४
याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला वतनात देत आहेत, तो ताब्यात घेतल्यावर, आधीच्या माणसांनी ठेवलेल्या शेजार्‍याच्या जमीन हद्दीच्या खुणा कदापि बदलू नये.
१५
केवळ एकाच साक्षीदाराच्या साक्षीवर तुम्ही कोणालाही त्याच्या गुन्ह्याबद्दल किंवा अपराधाबद्दल कदापि दोषी ठरवू नये. दोन किंवा तीन साक्षीदारांच्या संमतीने प्रकरण स्थापित केले पाहिजे.
१६
एखाद्याने मत्सराने खोटी साक्ष देऊन कोणावर चुकीचा आरोप लावल्यास,
१७
त्या दोन्हीही इसमांना याहवेहसमोर, त्यावेळी जबाबदार असलेल्या याजकांपुढे आणि न्यायाधीशांपुढे आणावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options