Skip to content
अनुवाद १७:१८-२०

अनुवाद १७:१८-२०

१८
जेव्हा तो आपल्या राजासनावर बसेल, तेव्हा त्याने लेवी याजकांच्या जवळ असणार्‍या नियमशास्त्रामधून हे सर्व नियम व आज्ञा स्वतः लिहून काढाव्यात.
१९
ती प्रत नेहमीच त्याच्याजवळ असेल. त्याने त्या नियमांचे दररोज वाचन करावे म्हणजे तो याहवेह त्याच्या परमेश्वराचा आदर करण्यास शिकेल आणि या नियमाचे आणि विधीचे सर्व शब्द काळजीपूर्वक पाळेल
२०
व त्याने स्वतःला आपल्या इस्राएली बांधवांपेक्षा अधिक श्रेष्ठ समजू नये आणि नियमांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नये. मग तो आणि त्याचे वंशज अनेक पिढ्या इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options