Skip to content
अनुवाद १६:१-८

अनुवाद १६:१-८

अवीव हा महिना पाळावा आणि याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी वल्हांडण सण साजरा करावा, कारण त्यांनी अवीव महिन्यात तुम्हाला इजिप्त देशामधून रात्रीच्या वेळी बाहेर काढले.
याहवेह तुमच्या परमेश्वराला तुमचे वल्हांडण सणाचे अर्पण म्हणजे शेरडेमेंढरे किंवा गाईबैल असावे आणि याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी जे स्थान निवडतील तिथे त्याचे अर्पण करावे.
ते खमीर असलेल्या भाकरीबरोबर खाऊ नये, परंतु सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी, ही तुमच्या क्लेशाची भाकर होय, कारण इजिप्त देश घाईघाईने सोडताना तुम्हाला खावी लागली होती—इजिप्तमधून तुमची सुटका झाली त्या वेळेची आठवण तुम्हाला आयुष्यभर राहील.
सात दिवसापर्यंत तुमच्या संपूर्ण देशात खमीर अजिबात दृष्टीस पडू नये. बली देण्यात आलेले मांस दुसर्‍या दिवसाच्या सकाळपर्यंत राहू देऊ नये.
याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या शहरांपैकी कोणत्याही शहरात तुम्ही वल्हांडणाच्या यज्ञपशूचे अर्पण करावयाचे नाही,
तर ते आपल्या नावाच्या स्थापनेसाठी जे स्थान निवडतील तिथेच वल्हांडणाचा यज्ञपशू तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी अर्पावा, कारण त्याच वेळेला तुम्ही इजिप्त देशामधून बाहेर पडला होता.
याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या स्थानी ते भाजावे आणि खावे. मग दुसर्‍या दिवशी सकाळी आपल्या तंबूत परतावे.
तुम्ही सहा दिवस बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी सभा भरवावी आणि कोणतेही काम करू नये.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options