Skip to content
दानीएल ७:९-१४

मनुष्याच्या पुत्राचे सार्वभौमत्व

दानीएल ७:९-१४
“जसे मी पाहिले, “सिंहासने मांडली गेली आणि प्राचीन पुरुष आपल्या आसनावर बसला आहे. त्याची वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती; त्याच्या मस्तकावरील केस लोकरीप्रमाणे पांढरे होते. त्याचे सिंहासन अग्निज्वालायुक्त होते, आणि त्याच्या सिंहासनाची चाके प्रज्वलित केलेल्या अग्नीप्रमाणे होती.
१०
अग्नीची नदी निघून वाहत होती जी त्याच्यामधून बाहेर येत होती. हजारोच्या हजार लोक त्याची सेवा करीत होते; कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आणि पुस्तके उघडली गेली.
११
“मग मी सतत त्याच्याकडे पाहत होतो कारण ते शिंग फुशारकीचे शब्द बोलत होते. मी सतत पाहत राहिलो जोपर्यंत चौथ्या पशूचे वध करण्यात आले नाही आणि त्याचे शरीर अग्निज्वालांमध्ये फेकण्यात आले नाही.
१२
(इतर पशूंचे अधिकार काढून घेण्यात आले, परंतु त्यांना आणखी काही काळ जिवंत राहण्याची परवानगी देण्यात आली.)
१३
“नंतर रात्री दृष्टान्तात पाहत होतो आणि मी पाहिले, मानवपुत्रासारखा आकाशात मेघारूढ होऊन येत असलेला दिसला. तो प्राचीन पुरुषाकडे गेला आणि त्याच्या उपस्थितीत त्याला सादर करण्यात आले.
१४
त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options