दानीएल ७:२३-२६
२३
“त्याने मला हे स्पष्टीकरण दिले: ‘हा चौथा पशू म्हणजे हे चौथे राज्य होईल जे पृथ्वीवर प्रकट होईल. ते सर्व राज्याहून निराळे होईल आणि ते संपूर्ण पृथ्वीला गिळंकृत करेल, तिला तुडवून टाकेल, आणि तिचे तुकडे करेल.
२४
ती दहा शिंगे म्हणजे दहा राजे. जे या राज्यातून येतील. यानंतर आणखी एक राजा येईल, जो आधीच्या राजांपेक्षा भिन्न असणार; तो या तिघांना वश करेल.
२५
तो परमोच्च परमेश्वराच्या विरुद्ध बोलेल आणि त्यांच्या पवित्र लोकांवर अत्याचार करेल आणि निर्धारित वेळ आणि कायदे बदलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र लोक एक वेळ, दोन वेळा आणि अर्धा वेळ त्याच्या हातात देण्यात येतील.
२६
“ ‘परंतु न्यायसभा बसेल आणि त्याचे सामर्थ्य काढून घेण्यात येईल आणि त्याचा कायमचा नाश करण्यात येईल.
Settings