Skip to content
दानीएल ५:७-११

दानीएल ५:७-११

मग राजाने मांत्रिक, ज्योतिषी आणि दैवप्रश्न करणार्‍यांना बोलावून घेतले. नंतर तो बाबेलच्या ज्ञानी लोकांना म्हणाला, “जो कोणी हे लिखाण वाचून त्याचा अर्थ मला समजावून सांगेल, त्याला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तो तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होईल.”
नंतर राजाचे सर्व ज्ञानी लोक आत आले, पण त्यांना त्या लेखाचा उमज पडेना किंवा त्याचा अर्थही राजाला सांगता येईना.
यामुळे राजा बेलशस्सर अत्यंत भयभीत झाला आणि त्याचा चेहरा अधिक पांढराफटक झाला. त्याचे अधिकारीदेखील गोंधळून गेले.
१०
राजा आणि अधिकार्‍यांचा आवाज ऐकून राणी मेजवानीच्या दिवाणखान्यात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा! घाबरू नका, आपली मुद्रा पालटू देऊ नका.
११
कारण ज्याच्यामध्ये पवित्र देवांचा आत्मा आहे असा एक मनुष्य आपल्या राज्यात आहे. तुमच्या पित्याच्या कारकिर्दीत हा मनुष्य जणू काय देवच आहे अशा ज्ञानाने व शहाणपणाने परिपूर्ण असून असे आढळून आले होते. तुमचा पिता नबुखद्नेस्सर राजाच्या कारकिर्दीत त्याला बाबेलमधील सर्व जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे या सर्वांवर प्रमुख नेमण्यात आले होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options