दानीएल ४:४-७
४
मी नबुखद्नेस्सर आपल्या महालात शांतीने, संतुष्टीचे आणि समृद्धीचे जीवन जगत होतो.
५
मी एक स्वप्न पाहिले, जेव्हा मी माझ्या बिछान्यावर निजलेला होतो, ते चित्र आणि दृष्टान्त जे माझ्या मनात आले, त्यामुळे मी अतिशय भयभीत झालो.
६
माझ्या स्वप्नाचा अर्थ काय ते कळावे या हेतूने मी बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांना आज्ञा दिली.
७
जेव्हा जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे आले, तेव्हा मी त्यांना माझे स्वप्न सांगितले, पण ते मला त्याचा अर्थ सांगू शकले नाही.
Settings