दानीएल ४:१३-१६
१३
“मी बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले की, स्वर्गातून एक पवित्र, एक दूत खाली येत आहे.
१४
त्याने मोठ्याने ओरडून सांगितले ‘हे वृक्ष तोडून टाका, फांद्या कापून टाका; पाने ओरबाडून काढा आणि फळे विखरून द्या. त्याच्या खालचे पशू निघून जावोत आणि फांद्यांवरील पक्षी उडून जावोत.
१५
परंतु त्याचा बुंधा व मुळे लोखंड व कास्याने बांधून सभोवतालच्या गवतात जमिनीवरच राहू द्या. “ ‘आकाशातील दव पडून त्यास भिजू द्या आणि त्याला भूमीवरील गवतामध्ये पशूंसोबत राहू द्या.
१६
सात वर्षापर्यंत, त्याचे माणसाचे मन बदलले जावो आणि त्याला पशूचे मन दिले जावो.
Settings