Skip to content
दानीएल १२:५-१२

दानीएल १२:५-१२

तेव्हा मी दानीएलाने पाहिले, नदीच्या या तीरावर एक आणि त्या तीरावर एक असे दोन पुरुष उभे असलेले मला दिसले.
त्यांच्यातील एकाने तागाची वस्त्रे नेसलेल्या व आता नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाला विचारले, “आधी सांगितलेल्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती काळ लागेल?”
तागाची वस्त्रे नेसलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाने आपला उजवा हात आणि त्याचा डावा हात स्वर्गाकडे उंचाविला व जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची शपथ देऊन सांगितले, “एक समय, दोन समय आणि अर्धा समय. शेवटी जेव्हा पवित्र लोकांच्या शक्तीचा नाश होईल तेव्हा या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”
हे मी ऐकले, पण त्यांचा अर्थ मला समजला नाही. म्हणून मी विचारले, “माझ्या प्रभू, या सर्वांचा शेवट कसा काय होणार?”
त्याने उत्तर दिले, “हे दानीएला, आता जा, कारण अखेरचा काळ येईपर्यंत या गोष्टींना गुंडाळून आणि शिक्का मारून बंद करण्यात आले आहे.
१०
पुष्कळ लोक शुद्ध, निष्कलंक आणि निर्मळ केले जातील, परंतु दुष्ट आपल्या दुष्टपणातच मग्न राहतील; एकाही दुष्टाला या गोष्टी समजणार नाही, परंतु जे सुज्ञ आहेत त्यांनाच याचा अर्थ काय ते समजेल.
११
“रोजचे यज्ञार्पण बंद होईल व ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापित होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील.
१२
धन्य ते जे 1,335 दिवस वाट पाहत राहतील आणि शेवट पाहतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options