आमोस ८:१-६
१
सार्वभौम याहवेहने मला हे दाखविले: पिकलेल्या फळांनी भरलेली एक टोपली दाखविली.
२
“आमोसा, तुला काय दिसते?” त्यांनी विचारले. मी उत्तर दिले, “मला पिकलेल्या फळांची एक टोपली दिसते.” मग याहवेह मला म्हणाले, “माझ्या इस्राएली लोकांचा समय परिपक्व झाला आहे; मी त्यांची गय करणार नाही.”
३
सार्वभौम याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मंदिरातील त्यांचे गीत मी आकांतात बदलेन. सर्वत्र अनेक मृतदेह मौन धरून पडलेली असतील!”
४
जे तुम्ही गरजवंतांना तुडवितात आणि देशाच्या गरिबांना दूर लोटता,
५
असे म्हणता, “अमावस्या केव्हा निघून जाईल म्हणजे आम्ही धान्य विकू शकू? आणि शब्बाथ केव्हा निघून जाईल, म्हणजे आम्ही धान्याचे कोठार उघडू?” तराजूत लबाडी करून, लबाडीच्या मापाने, किंमत वाढवू.
६
म्हणजे चांदीच्या मापात गरिबांना आणि पायतणाच्या एका जोडीसाठी गरजूंना विकत घेऊ, आणि गव्हाचा भुसाही विकायचा.
Settings