Skip to content
आमोस २:४-६

आमोस २:४-६

याहवेह असे म्हणतात: “यहूदीयाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी याहवेहचे नियमशास्त्र धिक्कारले आहे व त्यांचे विधी पाळले नाही. ज्या दैवतांचे अनुसरण त्यांच्या पूर्वजांनी केले होते त्या त्यांच्या खोट्या दैवतांनी त्यांची दिशाभूल केली होती,
म्हणून मी यहूदीयावर अग्नी पाठवेन आणि यरुशलेमचे किल्ले भस्म करेन.”
याहवेह असे म्हणतात, “इस्राएलला तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. चांदीसाठी ते एका न्यायी व्यक्तीला, आणि पायातील एका जोड्यासाठी गरजवंत व्यक्तीला विकतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options