Skip to content
आमोस १:९

आमोस १:९

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
याहवेह असे म्हणतात: “गाझाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण तिने सर्व लोकांना बंदिवासात घेतले आणि त्यांना एदोमला विकले,
म्हणून मी गाझाच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि तिच्या किल्ल्याला भस्म करेन.
मी अश्दोदच्या राजाचा आणि अष्कलोनचा राजदंड धरणार्‍याचा नाश करेन. शेवटच्या पलिष्टीचा नाश होत नाही तोपर्यंत मी आपला हात एक्रोनावर चालवेन,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.
याहवेह असे म्हणतात: “सोरच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण बंदिवासातील सर्वांना एदोमास विकले आणि बंधुत्वाच्या कराराची अवहेलना केली आहे.
१०
म्हणून मी सोरच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि तिच्या किल्ल्यांना भस्म करेन.”
११
याहवेह असे म्हणतात: “एदोमच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून अनुताप करणार नाही. कारण त्याने तलवार घेऊन आपल्या भावाचा पाठलाग केला आणि देशातील स्त्रियांचा वध केला, कारण त्याचा क्रोध निरंतर वाढत होता, आणि त्याच्या क्रोध अनियंत्रित वाढत गेला,
१२
म्हणून मी तेमानवर अग्नी पाठवेन आणि ती आग बस्राचे किल्ले भस्म करून टाकील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options